नांदीवली नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा अद्याप शोध लागला नाही
डोंबिवली दि.१२ – मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास नांदीवली येथील तुडुंब नाल्यात तोल जाऊन पडलेल्या हर्षल जिंदाल (२४) या तरुणाचा अजूनही शोध लागला नाही मात्र त्याला वाचवण्यासाठी दुसरा तरुण कोणीही उतरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे
मंगळवारी रात्री हर्षल क्लास संपवून घरी जात असताना नाल्याजवल मित्राशी बोलत असताना तोल जाऊन पडल्याची चर्चा असली तरी तेथील एका पानाच्या ठेल्यावर नशा करणाऱ्या गोष्टी दिल्या जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे
नाल्यात एक तरुण वाहून गेल्याचे समजल्यावर स्थानिक तरुणांनी शोध मोहीम घेतली अगदी आयरे खाडी पर्यंत शोध घेण्यात आला शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे ,नगरसेवक विश्वनाथ राणे स्थानिक शिवसैनिक रवी म्हात्रे सुधीर उर्फ भैया पाटील तहसीलदार इंदुलकर तलाठी भालेराव हे शोध कार्यात मदत करत होते तसेच पालिका कर्मचारी अग्निशमन दल बोटीतून बेपता तरुणाचा शोध घेत आहे. त्याच्या जोडीला काल ठाण्याचे टी डी आर एफचे 6 जवानही आले असून अजूनही शोध कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले.