नवी दिल्ली येथे ‘एक आरोग्य भारत संमेलनाचे’ उद्‌घाटन

नवी दिल्ली येथे आज ‘एक आरोग्य भारत संमेलनाचे’ उद्‌घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले. ‘एक आरोग्य’ चा अर्थ मनुष्य आणि प्राणी दोघांच्या आरोग्याशी संबंधित आहे, असे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा विचार करता जागतिक आरोग्य आणि उपजीविका सुरक्षा यांच्या संतुलनासाठी प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :- मुंबईत उद्या क्षेत्रीय सागरी सुरक्षा परिषदेत नितीन गडकरी नव्या धोरणाचे अनावरण करणार

पशुजन्य आजार सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतील, अशा भौगोलिक क्षेत्रात भारत मोडतो. आरोग्यासंदर्भात मानव, पशू आणि पर्यावरणजन्य आव्हानांचा सामना करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.