नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘हुनर हाट’चे मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे 14 ते 27 नोव्हेंबर 2018 दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आयोजित करण्यात आला असून केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज ‘हुनर हाट’चे उद्घाटन केले.
देशभरातील कारागीर आणि शिल्पकारांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘हुनर हाट’ आयोजित केला जातो असे नक्वी म्हणाले.
या हुनर हाटमध्ये महिला कारागीर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून देशभरातील हस्तकला आणि हातमागाची उतपादने उपलब्ध आहेत.
Please follow and like us: