नववर्ष स्वागत यात्रेसाठी डोंबिवली सज्ज
डोंबिवली – श्रीगणेश मंदीर संस्थान तर्फे हिंदू नववर्ष दिन अर्थात गुढी पाडव्यानिमित्त उद्या नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.सदर यात्रेसाठी संपूर्ण शहर आता सज्ज झालं आहे.
आज अनेक शहरात नववर्ष स्वागत यात्रा संपन्न होते परंतु डोंबिवलीतुन सर्वप्रथम या नववर्ष स्वागत यात्रेचा शुभारंभ झाला होता. यानंतर ईतर सर्व शहरांनी या यात्रेच्या आयोजनस सुरुवात केली.उद्या होणा-या या यात्रेसाठी डोंबिवलीकर आता सज्ज झाले आहेत.
उद्या सकाळी साडेसहा वाजता भागाशाळा मैदान येथून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे.श्रीगणेश मंदीर संस्थान येथील श्रींची पालखी व त्या मागोमाग शहरातील इतर असंख्य संस्थांचे चित्ररथ, देखावे ,यांची भव्य मिरवणुक हे या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण करत ही नववर्ष स्वागत यात्श्रीत्रा श्रीगणेश मंदीर संस्थानच्या श्रीगणेश मंदीर येथे येते व तेथे तिचा समारोप होतो.यात शहरवासी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याने यात्रे दरम्यान रस्ते असंख्य शहरवासियांनी फुललेले दिसतात.