नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या गोळवली प्रभागात नागरीकार्याचा धडाका

गोळवलीत नागरीकार्याचा धडाका

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्राभाग क्रमांक १०९ गोळवलीचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी त्यांच्या प्रभागात नागरीकार्याचा धडाका लावला आहे.सोमवारी याप्रभागात विविध नागरीकार्यांचा शुभारंभ करण्यात आला.

भाजापाचे नगरसेवक रमाकांत पाटील हे त्यांच्या कार्यकुशतेबद्द्ल प्रसिद्ध आहेत.त्यांच्या प्रयत्नांंतून गोळवलीचा विकास होत असून अनेक समस्या सोडवून रहिवाशांना नागरीसुविधा उपलब्ध करुन देण्यात त्यांना यश आले आहे.नुकतच पाटिल यांनी या प्रभागात पायवाटा व रास्ताबत्तीच्या कार्याचा शुभारंभ केला.गोळवली गावातील नागरिकांची समस्या लक्षात घेत येथील नागरिकांसाठी पायवाटा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेकडे याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करुन पाटील यांनी या कार्यासाठी पालिकेकडून मंजूरी मिळवली.

सदर पायवाटेच्या कार्याचे आज भूमिपूजन करण्यात आले.तसेच प्रभागातील पांडुरंगवाडी ते गोळवली गावापर्यंत रस्ताबत्तीची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. या रस्ताबत्तीचा आज शुभारंभ करण्यात आला.सदर रस्ताबत्ती सुरु झाल्याने रात्री अंधारात रस्त्याने जाणा-यांना होणारा त्रास आता संपुष्टात आला आहे.याबद्दल येथील रहिवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

पायवाटा तसेच रस्ताबत्ती अशा नागरीकार्यांच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक रमाकांत पाटील,भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा महासचिव शिवाजी अव्हाड़,भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटिल, अॅड़. शिवराम गायकर,परशुराम केणे,बाळाराम म्हात्रे,रामजी केणे,प्रकाश भोईर,विश्वनाथ म्हात्रे,गोरख म्हात्रे,अनिल पाटिल,गुरु भोईर,रवि गायकर,रामा म्हात्रे,यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या कार्यांचा शुभारंभ करण्यात आला.

 

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email