नगरसेवक रमाकांत पाटील यांनी केला आयुक्तांसमक्ष अधिका-यांंच्या कारभाराचा पंचनामा

नगरसेवक रमाकांत पाटील यांनी आयुक्तांसमक्ष पालिकेच्या  अधिका-यांचे पितळ उघडे पाडले

साहेब आपण कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत नवीन आहात पण तुमच्या कार्यपद्धतीतून तुमच्या रुपाने मनपा सहित २७ गावाना एक चांगले आयुक्त लाभले आहेत.पण आपल्याच मनपातील उपायुक्त पदी असणारे सुरेश पवार यांच्या सारखे भ्रष्ट अधिकारी २७ गावांचा विकास होवू देवू ईच्छित नाहित.त्यांना अनधिकृत बांधकामातुन येणारा आपला वाटा पाहिजे असतो .तुम्ही येणार असल्याची माहिती आम्हा २७ गावातील नगरसेवकांना नाही पण विरोधकांना याची व्यवस्थित माहिती देण्याचे काम तुमचे अधिकारी करतात.तुम्हाला विरोध होईल,तुमच्या विरोधात घोषणाबाजी होईल व याला कंटाळुन तुम्ही या गावांच्या विकासासाठी योजना राबवाणार नाहीत.यातून त्यांची अनधिकृत बांधकामातुन होणारी कमाई अबाधित राहील अशी पालिकेतील काही अधिका-यांची ईच्छा आहे.आशा आशयाचा खळबळजंक आरोप प्राभाग क्रमांक १०९ चे भाजपाचे नगरसेवक रमाकांत पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकचे नवे आयुक्त गोविंद बोडके यांच्यासमक्ष मनपा उपायुक्त सु.रा. पवार यांच्यावर केले.
कल्याण मनपा आयुक्त गोविंद बोडके यांना नगरसेवक रमाकांत पाटिल यांनी आपल्या प्रभागातील व इतर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या शुक्रवारी दूरध्वनीद्वारे निदर्शनास आणून दिली होती.यादरम्यान शनिवारी आयुक्तांनी अचानक २७ गावांचा दौरा आयोजित केला होता.ज्यात आयुक्तांना अनेक ठिकाणी ग्रामास्थांच्या विरोधाचा सामना करावा लागला. नगरसेवक रमाकांत पाटिल यांच्या नुसार सुरेश पवार यांच्या सारखे भ्रष्ट अधिकारी या २७ गावांचा विकास होवू नये यासाठी प्रयत्नशील आहेत.आयुक्तांच्या २७ गावातील दौ-याची माहिती यासाठी त्यांनी येथील नगरसेवकांना दिली नाही या उलट त्यांनी याची माहिती विरोधात असलेल्याना दिली.व आयुक्ताना जाणीवपूर्वक अशाच ठिकाणी नेले जिथे विरोधक आधीच उपस्थित होते आणि आयुक्तांसमक्ष जोरदार घोषणाबाजी झाली.
नगरसेवक पाटील यांच्या नुसार हे भ्रष्ट अधिकारी कसे वागतात याचे उदाहरण म्हणजे शनिवारी आयुक्त येणार असल्याचे शुक्रवारी संध्याकाळी नश्चित झाले.आयुक्तांच्या या दौ-यासाठी अधिका-यांनी त्यांच्या जवळच्या ठेकेदारांकडून रातोरात रस्त्यावरील खड्डे भरून घेतले तसेच त्यांच्या अवैध कमाईचा आणखी एक स्त्रोत असणारी अवैध होर्डिंग कल्याण शीळ रोड येथून हटवण्यात आली.नगरसेवक पाटील यांच्या अनुसार सदर दोन्ही गोष्टी त्यांनी मनपा आयुक्त बोडके यांना सांगितल्या.या दौ-याला मनपा आयुक्त यांच्यासह उपायुक्त सुरेश पवार, अधिकारी कोलते,विजय पाटिल तसेच मोठ्या संख्येने इतर अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email