नकोशी झाली म्हणून आईने आपल्याच मुलीला मारले
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – पहिली दोन मुले झाल्यानंतर तिसरी मुलगी झाल्याचा राग मनात ठेवून आईनेच नुकत्याच जन्मलेल्याया आपल्या तान्हुलीच्या गळ्यावर नखाने ओरबडले यामुळे ते बाळ रक्तबंबाळ झाले व त्यातच ते मरण पावले.
उबर्डे येथील वैशाली प्रधान या रहात असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे तिसऱयावेळी ती पुनः गरोदर झाली व तिला मुलगी झाली मात्र आईला मुलगी नको होती त्यामुळे त्या मातेने संतापाच्या भरात तान्हुलीच्या गळ्यावर नखाने ओरबडले व ती मुलगी जखमी झाली अखेर तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉकटrnaa गळ्यावर जखम दिसली व रक्तस्त्रावामुळे ते बाळ दगावले होते अखेर पोलीस आले व त्यांनी चौकशी केली असता त्या महिलेने आपणच मुलीला ‘नको ‘म्हणून मारले अशी कबुली दिली अखेर पोलिसांनी वैशाली प्रधान हिला अटक केली असून खडक पाडा पोलीस पुढील तपास करत आहेत
Please follow and like us: