ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणे
ठाणे दि.१९ – ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरु झाली आहे. नियमात ठरवून दिलेल्या आवाजाच्या पातळीपेक्षा उत्सवातील आवाजाची पातळी जास्त असल्याचे यापुर्वीच्या कारवाईतून उघड झाले आहे. या संदर्भात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांकरिता नियमावली तयार करण्याच्या सुचना राज्यातील सर्वच महापालिकांना दिल्या होत्या.
हेही वाचा :- पुण्यात उद्या बेमुदत चक्री उपोषण
रस्त्यांवर साजरे होणाऱ्या उत्सवांकरिता महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी प्रशासनाने ‘तक्रार निवारण यंत्रणा’ कार्यन्वित केली आहे. या यंत्रणेमुळे नागरिकांना आता बेकायदा मंडप आणि ध्वनी प्रदुषणासंबंधीच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक, ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे नोंदविणे शक्य होणार आहे. या तक्रारीच्या आधारे संबंधित विभागाकडून कारवाई केली जाणार असून त्याचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे तक्रारीवर नेमकी काय कारवाई झाली, याबाबत ठाणेकरांना माहिती मिळणार आहे.
हेही वाचा :- धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न एका तरुणीच्या जीवावर बेतले
त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यावर साजरे होणाऱ्या सार्वजनिक उत्सवांकरिता नियमावली तयार केली असून त्यास सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिलेली आहे. गेल्या वर्षीपासून या नियमावलीची शहरात महापालिकेने अंमलबजावणी सुरु केली असून यंदाही नियमावलीचे पालन करण्याच्या सुचना पालिकेने गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत दिल्या आहेत. त्याचबरोबर आता उत्सवांसाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाईची तयारी पालिकेने सुरु केली असून त्यासाठी नागरिकांना बेकायदा मंडप आणि ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.