धूम स्टाईल लुटारूनी डोंबिवली कल्याण शीळ रोड वर एकच थैमान
डोंबिवली दि.१० – धूम स्टाईल लुटारूनी डोंबिवली कल्याण शीळ रोड वर एकच थैमान घातले असून दोन पादचाऱ्याचे मोबाईल हिसकवल्याची घटना घडली असून या प्रकरनी अद्न्यात चोरट्या विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कल्याण पुर्वेकडील पिसवली नेताजी नगर येथे राहणारे विष्णू कुंभकर्ण हे ३ तारखेला कल्यान रोड येथील युनिक चौकातून मोबाईल वर बोलत जात असताना अचानक पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली. या दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून क्षणार्धात धूम ठोकली. तर डोंबिवली पुर्वेकडील दावडी गावात भाग्यश्री निवास मध्ये राहनरे वेदप्रकाश सिंग हे काल सकाळी दावडी नाका येथूण चालत जात असताणा पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली. दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून धूम ठोकली. या दोन्ही घटने एक दुचाकी वापरण्यात आली आहे . या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.