धूम स्टाईल लुटारूंच थैमान सुरूच,भल्या पहाटे दोन महिलांची लूट.

( श्रीराम कांदु )

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये धूम स्टाईल लुटारूंचे थैमान सुरू असून रविवारी सकाळी दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र या चोरट्यांनी लंपास केले आहे. कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरात सह्याद्री चाळीत राहणारी महिला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास म्हसोबा चौक येथून घराच्या दिशेने पायी जात होती. इतक्यात पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने गळ्यावर थाप मारत 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून धूम ठोकली. या प्रकरणी सदर महिलेने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तर दुसरी घटना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. जिमखाना रोडला पवनपुत्र बिल्डींगमध्ये राहणारी महिला फुल विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. सकाळी पावणे सहाच्या सुमारास ही महिला मुलुंड येथे फुल विक्री करण्यासाठी निघाली. जिमखाना रोडने डोंबिवली स्टेशनच्या दिशेने पायी जात असतना अचानक पाठीमागून एक दुचाकीस्वार आला. त्याने या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे दोन मंगळसूत्र खेचुन पळ काढला. या प्रकरणी सदर महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email