धूम स्टाईल लुटारूंची दहशत ; पिशवी खेचण्याच्या प्रयत्नात फरफटत नेले
डोंबिवली – धूम स्टाईन ने पादचारी इसमाची पिशवी खेचण्याचा प्रयत्न करत सदर इसमाने प्रतिकार केल्याने या चोरट्यांनी त्याला फरफटत नेल्याची घटना कल्याण पश्चिम येथे घडली आहे या प्रकरणी बाजार पेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
कल्याण पश्चिम सिद्धेश्वर आळी लक्ष्मी निवास अपार्टमेंट मध्ये राहणारे सुमित बीद्वर्झ २६ हा तरुण रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास कामावरून परतत असतना नमस्कार मंडळ येथून लाल चौकीच्या दिशेने जात होता .यावेळी पाठीमागून भरधाव वेगाणे एक दुचाकी आली दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने सुमित यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र सुमित ने प्रतिकार केल्याने तो खाली पडला असता या दुचाकी स्वरांनी त्याला फरफटत नेले .या घटनेत सुमित जखमी झाला आहे .या प्रकरणी सुमित याने बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .