धूम स्टाईलने दागिने लंपास

कल्याण – कल्याण डोंबिवली परिसरात धूम स्टाईलने पादचारी महिलाचे दागिने हिसकवून धूम ठोकण्याचे प्रकार वाढत असल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे . डोंबिवली शेलार नाका त्रिमूर्ती नगर येथे राहणारी महिला काल सायंकाळी कल्याण खडकपाडा येथे कैलास पार्क परिसरात कामानिमित्त आली होती . काल रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ती कैलास पार्क येथील रस्त्याने जात असतान समोरून भरधाव वेगाने दुचाकी आली या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यावर थाप मारत गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून क्षणार्धात धूम ठोकली .या प्रकरणी सदर महिलेने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email