धूम स्टाईलने चेन लंपास
कल्याण- कल्याण पश्चिम चिकणघर परिसरात हर्शना अपार्टमेंट मध्ये राहणारे एग्नेस केसकर हे शिक्षक असून शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारस हॉली क्रोस रोड वरून पायी जात असतांना भरधाव वेगाने दुचाकी आली दुचाकीवर बसलेल्यानी क्षणार्धात केसकर यांच्या गळ्यातील ३५ हजारांची चैन खेचून पळ काढला .या प्रकरणी केसकर यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us: