धूमस्टाईल महिलेचे मंगळसूत्र लांबवले

डोंबिवली  – सांगली येथे राहणाऱ्या अर्चना जाधव या कामानिमित्त कल्याणात आपल्या नातेवाईकाकडे आल्या होत्या .मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या नातेवाईकांसह नेतिवली येथे पूजेचा कार्यक्रमावरून घरी परतत असताना राधेकृष्ण मंदिरा समोरून जात असतांना अचानक पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली .या दुचाकीवर तरुणाने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून क्षणार्धात धूम ठोकली .या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email