धावत्या मालगाडीच्या चढून महिला गार्डचा विनयभंग करणारा विकृत गजाआड

कल्याण दि.३० – काही दिवसांपुर्वी कल्याण पूर्वेकडील रेल्वे यार्डात धावत्या मेलगाडीत चढून एका महिला गार्ड शी दोन तरुणांनी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी अजय भिंगारदिवे या तरुणाला अटक केली असून त्याचा साथीदार बारक्या हा पसार झाला आहे.

२१सप्टेंबर रोजी सदर पीडित महिला कल्याण कसारा मालगाडीवर महिला गार्ड ड्युटीवर होती. कल्याणच्या दिशेने मालगाडी येत असताना सिग्नल न मिळाल्याने गाडी स्लो झाली होती याच संधीचा फायदा घेत दोन तरुण जबरदस्तीने मालगाडीच्या चढले व कार्यरत असणाऱ्या महिला गार्ड शी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला.

याच दरम्यान सदर पीडित महिलेने आरडाओरड करत प्रतिकार केल्याने या दोघा विकृतांनी तेथून पळ काढला. घडल्या प्रकाराबाबत महिला गार्ड ने कोळशेवाडी पोलीस स्थनाकात तक्रार नोंदवली होती या तक्रारी नुसार कोलशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. याच दरम्यान या प्रकरणी आरपीएफ कडून या आरोपींचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणी अजय भिंगारदिवे उर्फ सोहेल उर्फ वसीम याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार बारक्या हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email