देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात एक टक्क्याने घट

नवी दिल्ली, दि.२६ – देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 25 ऑक्टोबर 2018 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये 112.67 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 70 टक्के इतके आहे. या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 161.993 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 17.21 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे. झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.