देशातल्या 91 मोठ्या जलाशयांतील पाणी साठवणूक पातळीत 3 टक्क्यांची घट
नवी दिल्ली, दि.०२ – देशातल्या 91 मोठ्या जलाशयातील पाणी साठवणूक पातळीत 3 टक्क्यांची घट झाली आहे. 1 नोव्हेंबर 2018 रोजी संपलेल्या आठवड्यात या 91 जलाशयातली पाण्याची पातळी एकूण पाणी साठवणूक क्षमतेच्या 67 टक्के म्हणजेच 109.247 बीसीएम होती. 25 ऑक्टोबर 2018 रोजी संपलेल्या आठवड्यात हीच पातळी 70 टक्के होती. 1 नोव्हेंबर 2018 रोजी या जलाशयातली साठवणूक क्षमता गेल्या 10 वर्षांच्या सरासरी क्षमतेच्या 97 टक्के होती. या 91 जलाशयांपैकी 37 जलाशयातून 60 मेगावॅटहून अधिक वीज निर्मिती होते.
Please follow and like us: