दुषित पाण्यामुळे लहान मुलांना उलट्या- जुलाबाचा  त्रास ..

(श्रीराम कांदु)

 डोंबिवली – येथील पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवरील श्री गंगोत्री इमारतीत दोन दिवस दुषित पाणी आल्याने लहान मुलांना उलट्या- जुलाबाचा त्रास सुरु झाला आहे. या इमारतीतील साडे तीन वर्षाची लहान मुलीला  हा त्रास झाल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.

  इमारतीतील पाण्याची टाकीच्या पाईपलाईन मध्ये गटाराचे पाणी आल्याने सर्वांच्या घरात गेली दोन दिवस दुषित पाणी आले होते.काही लहान मुलांनी हे दुषित पाणी पिल्याने त्यांना उलट्या- जुलाबाचा त्रास सुरु झाला. या इमारतीत राहणारे किशोरी कुवळेकर यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी त्यांची साडे तीन वर्षाची नात सनवी गुगरे राहण्यास आली होती. सनवीने दुषित पाणी पिल्याने तिला पूर्वेकडील खाजगी रुग्णालयात उपचार दाखल केले आहे. तर या इमारतीतील वेद करलेकर ( १२ ) यालाही जुलाब सुरु झाले आहेत. त्या इमारतीच्या आजुबाजुकडील दोन ते तीन इमारतीत दुषित पाणी आल्याने रहिवाशी वैतागले आहेत.या संदर्भात पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना विचारले असता ड्रेनेजचे चेंबर चाॅकब झाले होते. चेंबरची लेवल वर आल्याने हे पाणी पाणीच्या पाईपलाईनमध्ये घसले उद्याचे एक दिवस खराब येईल.पालिकेने या इमारतीचा नळजोडणी बंद केली असून काम पूर्ण झाल्यावर चांगले पाणी आल्यावर नळजोडणी  पूर्ववत करण्यात येईल.पालिका या इमारतीला दोन दिवस टॅकरने पाणीपुरवठा करेल. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email