दुर्गरक्षकांचा गुमतारा किल्ला येथे दीपोत्सव
( म विजय )
ठाणे : महाराष्ट्रातील इतिहास कालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्षणे पावन झालेल्या ठाणे जिल्ह्यातील गुमतारा किल्ला येथे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्यावेळी जिल्यातुन दुर्गरक्षक सहभागी झाले होते. त्यावेळी दीपावली निमित्त दीप प्रजोलन करण्यात आले.
दीपावलीच्या पहिल्याच दिवशी पहिला दिवा ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करत देऊळात देव जिवंत ठेवला, त्या देवाला पहिला दिवा अर्पण करण्याकरिता ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दीपोत्सव मोहिम आयोजित करण्यात आली होती. दिपालविलीच्या पहिल्याच दिवशी सकाळी 4 वाजता ठाणे जिल्ह्यातील सुमारे 1900 फूट उंचावर्ती गुमतारा किल्ला येथे चढाई करण्यास दुर्गरक्षकांनी सुरुवात केली. परंतु पावसानंतर पहिल्यांदाच ह्या किल्ल्यावर्ती चढाई करण्यात आल्यामुळे किल्यावर जाणारा रस्ता संपूर्ण पने बंद झाला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज की जय उद्घोषणा करत दुर्गरक्षकांनी दुर्गावर जाण्याचा मार्ग सहा तास भर करत अखेर किल्यावर जाऊन दीप प्रजोलन केले. किल्ल्यावरील मंदिरात देवीच्या मूर्ती समोर पूजा करून दीप प्रजोलन करण्यात आले . नंतर मुख्य दरवाजा या परिसरात दीप प्रजोलन करण्यात आले. त्यावेळी छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. अशा प्रकारे दीपोत्सवाचा कार्यक्रम यशस्वि करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आमदार संजय केळकर, कार्याध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यानुसार ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अमित मोकाशी, खजिनदार सुरज कदम, सचिव रोशन कदम, योगेश बोरसे यांनी विशेष मेहनत घेतली.