दुरुस्तीचे काम सुरु असताना इमारतीच्या पिलरला तडा …२२ कुटुंबीय बेघर ..
डोंबिवली – पूर्वेकडील सुनील नगर मधील डी.एन.सी. रोडवरील म्हात्रे कंपाउंड जवळील ओम शिव गणेश इमारतीचे गेली महिनाभर दुरुस्तीचे काम सुरु आहे. सोमवारी दुपारी अचानक या इमारतीच्या पिलरला तडे गेल्याने हादरा बसला. त्यामुळे रहिवाश्यांनी घाबरून इमारती खाली जमा झाले. या घटनेची माहिती समजताच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, स्थायीसमितीचे सभापती राहुल दामले आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे इमारतीतील २२ कुटुंबीय बेघर झाली आहेत.
ओम शिव गणेश इमारतीला २५ वर्ष पूर्ण झाले असून या इमारतीती २२ कुटुंबीय राहतात.या इमारतीतील रहिवाश्यांनी प्रत्येकी ४० हजार भरून इमारत दुरुस्तीचे काम दिले होते.इमारतीचे स्टचरल ऑडीट झाल्याची माहिती येतील रहिवाशी कैलाश पवार यांनी सांगितले.पालिका अधिकारी आणि स्टचरल ऑडीटर माधव चिकोटी,राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी इमारतीची पाहणी केली. रहिवाश्यांची सुरक्षा महत्वाची असून त्यादृष्टीकोनातून पालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा असे राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. तर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी इमारतीचे दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने पिलरला तडा गेल्याचे सांगितले. उपअभियंता महेश गुप्ते यांना विचारले असता ते म्हणाले, सर्व रहिवाशी इमारतीच्या बाहेर आले असून घरातील सामान बाहेर काढले नाही रहिवाश्यांना इमारती राहण्यास धोका असल्याने त्यांना काही दिवस नातेवाईकांच्या घरी राहण्यास जाण्याचा सल्ला दिला आहे.
Please follow and like us: