दुपारी झोपणे पडले महागात,अज्ञात चोरट्याने रोकड लांबवली

आंबा विक्रेत्याची ५० हजारांची रोकड लांबवली

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथे अष्टविनायक सोसायटी मध्ये राहणारे इसमाचे मानपाडा रोड नवजीवन रूग्णाल्याच्या बाजूला आंब्याचे दुकानं आहे .काल दुपारी तीन वाजण्याच्या सुंमारास तक्रारदार यांना झोप आल्याने त्यांनी आंबे विक्री करून मिळालेले पैसे व दुकानाचे पैसे असे मिळून ५० हजार रुपये शर्टाच्या आतील खिशात ठेवून शर्ट गुंडालुन आंब्याच्या पेटीवर ठेवत त्या शेजारी झोपले .अज्ञात चोरट्याने ते झोपेत असल्याची संधी साधत रोकड लांबवली काही वेळाने त्याच्या दुकानात ग्राहक आला असता त्याला आंबे दिले मात्र सुट्टे पैसे देण्यासाठी शर्टचा खिसा तपासला असता चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email