दिवा रेल्वे स्थानकाला स्वच्छ स्थानक पुरस्कार 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – स्वच्छ स्थानक पुरस्कार मिळाल्यामुळे दिवा स्टेशनचे प्रबंधक शंकर नारायण यांच्या हस्ते दिवा स्टेशन साफ करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  
भारतीय रेल्वेचा १६५ वा वाढदिवसादिवशी रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वे विभागामार्फत दिवा स्टेशनला स्वच्छ स्थानक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा सत्कार दिवा स्टेशन साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मिळाल्यामुळे दिवा स्टेशनचे प्रबंधक शंकर नारायण यांनी आज त्यांचा सत्कार केला. 
१६ एप्रिलला भारतीय रेल्वेचा १६५ वा वाढदिवस रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी वेगवेगळ्या भागातील सर्वोत्कृष्ठ कामगिरीबद्दल अनेक स्टेशनचा सत्कार करण्यात आला. तर  

रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वे विभागामार्फत दिवा, कल्याण आणि कर्जत स्टेशनला स्वच्छ स्थानक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा  स्वच्छ स्थानक पुरस्कार दिवा स्टेशन कडून स्टेशन प्रबंधक शंकर नारायण यांनी स्विकारला. त्यावेळी त्यांनी आपल्या सफाई कामगरांचे कौतूक करुन रेल्वे प्रशासनाचे आभाग मानले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email