दिवाळी सुटटीच्या तोंडावर डोंबिवलीतील महापालिकेचा तरण तलाव दुरुस्तीसाठी बंद

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०२ – कल्याण डोंबिवली महापालिकेचा सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव ऐन दिवाळी सुटटीच्या तोडावर किमान १५ दिवस दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्याची व पोहेाणा-या खेळाडूंची गैरसोय होणार आहे डोंबिवलीत एकूण तीन तलाव असून डोंबिवली जिमखान्याचा तरण तलाव केवळ सभासदांसाठी राखीव आहे.

क्रीडा संकुलातील तरण तलावीतल फिल्टर प्लॅनटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देण्यात येत आहे गेले काही दिवस तलावातील पाणी गढूळ होत असल्याच्या तक्रारी होत्या अखेर प्लँन्टची दुरुस्ती होई पर्यत किमान १५ दिवस तलाव बंद ठेवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.येत्या ४ नोव्हेंबर पासून शाळा-महाविद्यालयांना दिवाळी सुटटी सुरु होत असून या काळात शालेय विद्यार्थी पोहायला शिकण्यासाठी येत असतात नेमक्या सुट्टीच्या तोडांवर तलावातील पाणी शुध्दीकरण केंद्रात बिघाड झाल्याने काही अपघात होऊन दुर्घटना होऊ नये म्हणून तलाव बंद ठेवण्याचा निर्णय धेण्यात आला.

फिल्टर प्लँनटमधील पाणी शुध्द करणारी रेती पाच वर्षापूर्वी टाकण्यात आली होती ती आता खराब झाल्याने पाण्यात येत असून त्यामुळे पाणी खराब होत आहे. यामुळे तलाव बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता असे कनिष्ठ अभियंता शैलेश मळेकर यांनी सांगीतले. किमान यासाठी १५ दिवस लागणार असून दिवाळी संपल्यावर कामाला प्रारंभ करण्यात येईल असेही त्यानी सांगितले. जर तलाव बंद केला नाही तर अपघात होण्याची भिती असून पाण्यात गेलेले दिसत नाही इतके पाणी खराब होते असेही त्यानी सांगितले.

डोंबिवली जिमखान्यात काल पासून सुरु

दरम्यान डोंबिवली जिमखान्याने दिवाळी सुटटीनिमित्त पोहोण्याचे विशेष प्रशिक्षण १ तारखेपासून सुरु केले असून मासिक फी १४०० तर दोन महिन्यांची फि २६०० रुपये इतकी ठेवली आहे अशी माहिती अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक यांनी दिली.सुटटी व्यतिरिक्त जिमखान्याचा तरण तलाव केवळ सभासदांसाठी आहे असेही त्यानी सांगितले.

Hits: 35

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email