दिल्लीत व राज्यात सत्ताधारीच उपोषणावर

नवी दिल्ली – देशात बहुमताने निवडून आलेल्या भाजप सरकारवर अखेर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. मुळात काँग्रेस राजवटीत सुद्धा भाजपने अनेकदा संसदेच काम रोखून धरलं होत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. केवळ विरोधकांनी ‘छोले भटोरे खात’ उपोषण केलं म्हणून आम्हीच ‘सच्चाग्रही’ आहोत हे दाखवण्यासाठी हा भाजपचा अट्टाहास आहे अशी प्रतिक्रिया सामान्य व्यक्त करत आहेत.
काँग्रेसने आणि यूपीएच्या घटक पक्षांनी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गोंधळ घालून वाया घालवल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपने आजचा उपोषणाचा देशभर कार्यक्रम आखला आहे.
नरेंद्र मोदी दिल्लीत, अमित शहा कर्नाटकात तर मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. तसेच त्यात भाजपचे इतर नेते सुद्धा सहभागी होतील. गुरुवारी सकाळी ११ वाजता हे उपोषण सुरु होऊन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे आत्मक्लेष उपोषण होणार आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा त्यांनी भाजपच्या या उपोषण नाट्याला केवळ उत्तराला प्रतिउत्तर असेच वर्णन केलं. यातून सध्या काय होणार हे उपोषणकर्त्यांना सुद्धा माहित नसावं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email