दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्याने आपली इज्जत गेली म्हणून बाईक जाळली
दुव्वदा पोलिसांनी दारू पिऊन बाईक चालवताना ट्रॅफिक पोलिसांनी सत्यनारायण यांना अटक केली आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सत्यनारायणची बाईक जप्त केली आणि सत्यनारायण यांना 12 सप्टेंबर रोजी समुपदेशनासाठी हजर राहण्याचा आदेश दिला. बुधवारी सत्यनारायण पोलिसांसमोर हजर झाले, यावेळी त्यांचे समुपदेशन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणने कोर्टात दंड भरला आणि आपली बाईक सोडवून घेतली.
बाईकची चावी मिळताच सत्यनारायण धावत बाईकपाशी गेला. त्याने पेट्रोलची टाकी उघडली आणि आतमध्ये माचिसची काडी पेटवून आतमध्ये टाकली. यामुळे त्याची बाईक जळून खाक झाली. पोलीस स्टेशनच्या समोर घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस कर्मचारी धावत बाहेर आले, त्यांनी सत्यनारायणला असं का केलं म्हणून विचारलं. दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्याने आपली इज्जत गेली, अपमान झाला. हे सहन न झाल्याने आपण ही बाईक जाळून टाकल्याचं त्याने म्हटलंय.