दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राला मारहाण
डोंबिवली : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला त्याच्या दोन मित्रांनी लोखंडी सळीने बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे .अमोल भगत असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात प्रशांत वाघमारे व परश्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्ती नगर शेलार चौक येथे राहणारा अमोल भगत २४ हा तरूण काल सायंकाळी कामानिमित्त चोळेगाव मार्गे त्रिमूर्ती नगर येथे गेले होते .यावेळी अमोलला रस्त्यात त्याचा मित्र प्रशांत वाघमारे व परश्या याने अडवले व दारूसाठी पैसे मागितले मात्र अमोलने नकार दिल्याने दोघांनी शिवीगाळ करत त्याला बेदम मारहाण केली तर प्रशांतने लोखंडी सळीने अमोलच्या डोक्यात प्रहार केला .या मारहाणीत अमोल गंभीर जखमी झाल असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .या प्रकरणी अमोलने डोंबिवली पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी प्रशांत वाघमारे व परश्या यांच्यावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .