दरोड्याच्या तयारीत असलेले चार दरोडेखोर गजाआड तर एक फरार
डोंबिवली : दरोड्याच्या उद्देशाने रात्रीच्या सुमारास कटेहाळणीरणाऱ्या चार दरोडेखोराना घातक शस्त्रासह डोंबिवली पोलिसांनी अटक केली असून त्यांचा एक साथीदार यावेळी झालेल्या झटा पटी दरम्यान पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. किरण जाधव ,मंगेश शेलार,अक्षय आहिरे ,रात्नेश महाकाळ असे अटक दरोडेखोरांचे नाव असून त्यांचा साथीदार अमित जगताप हा पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत
डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रे नगर परिसरात आज पहाटे ३ च्या सुमारास डोंबिवली पोलिसांचे गस्ती पथक गस्त घालत असताना या परिसरातील गणेश कृपा सोसायटीच्या भिंती लगत काही जन संशया स्पद रित्या हालचाली करत असल्याचा संशय या पथकातील पोलीस कर्मचार्यांना आला .पोलिसांनी या पाच जणांना हटकले असता या पाचही जननी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र या मधील किरण जाधव ,मंगेश शेलार,अक्षय आहिरे ,रात्नेश महाकाळ या चौघांना घातक शस्त्रासह अटक करण्यात पोलिसांना यश आले .तर या झटापटी दरम्यान त्यांचा साथीदार अमित जगताप पळून जाण्यात यशस्वी ठरला .दरम्यान किरण जाधव ,मंगेश शेलार,अक्षय आहिरे ,रात्नेश महाकाळ हे चौघे डोंबिवलीत राहणारे आहेत. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात या दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या या पाच जना विरोधात गुन्हे दाखल करत फरार अमित जगताप चा शोध सुरु केला आहे.