दरमहा 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक दाराना लाखोंचा गंडा सात जणा विरोधात गुन्हा दाखल

कल्याण – गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देन्याचे आमिष दाखवत सात जणांच्या टोळीने विश्वासाने आयुष्यची पुंजी गुंतवणाऱ्या गुतवणूकदारणा लाखांचा गंडा घातला आहे. या खडकपाडा पोलीस स्थानकात प्रकरणी अमीत भारद्वाज, अजय भारद्वाज, रवी मिश्रा, सूरज सिंग, रतन मोरपाणी, अमित बिर, चेतन पाटील या सात जणा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिम योगिधाम अजमेरा हाईटस मध्ये राहणारे रघुनाथ कुलकर्णी याना रवी मिश्रा आणि त्याच्या साथीदारानि गेट बिट कोईन कंपनीत बिट कॉईन १८ महिने गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के परतावा मिळणार असल्याचे आमिष दाखवले. या आमिशला बळी पडून मागील वर्षभरापासून कुलकर्णी यांनी या कंपनीत २९.१ बिट कॉइन म्हणजे च भारतीय दरा प्रमाणे तब्बल २२ लाख ५९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. कुलकर्णी यांच्यासह अनेक जणांना त्यांनी अशा प्रकारे आमिष दखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. मात्र काही महिन्यातच त्यांनी कंपनी बंद करत गाशा गुंडाळला. कंपनी बंद असल्याचे पाहून कुलकर्णी याना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी या प्रकर्णी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अमीत भारद्वाज, अजय भारद्वाज, रवी मिश्रा, सूरज सिंग, रतन मोरपाणी,अमित बिर, चेतन पाटील या सात जणा विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email