दंतेवाड्यात पार पडलं अनोखं लग्न
छत्तीसगड – छत्तीसगड राज्यातल्या दंतेवाडा शहरात कालिया आणि सुंदरीचं लग्न संपन्न झालेल आहे. वर कालिया आणि वधु सुंदरी हे दुसरे तिसरे कोणी नसून दंतेवाडा जिल्ह्यात आढळणारे कडकनाथ जातीचे कोंबडा आणि कोंबडी आहेत. दंतेवाड्यात त्यांचं अनोखं लग्न पार पडलं.
कालिया आणि सुंदरीचा हा लग्नसोहळा संपन्न करण्यासाठी छत्तीसगड राज्यातल्या दंतेवाडा जिल्ह्यातले शेकडो आदिवासी कुटुंब वऱ्हाडी झाले. त्यांच्या लग्नाचा हा सोहळासुद्धा प्रशासन प्रायोजित आहे.कालिया आणि सुंदरीला लग्नासाठी माणसा प्रमाणं सजवलं आहे. त्यांना मुंडावळ्या बांधून हळदही लावली गेली आहे. त्यानंतर वधुवराकडील मंडळींचा गाठी-भेटीचा कार्यक्रम पार झाला आहे. जवळच्या कासोली इथल्या इंद्रावती बचत गटाच्या कुक्कुटपालन संस्थेतली सुंदरी आता वधू बनून शेजारच्या गावातल्या एका शेतकरी गटाच्या कुक्कुटपालन संस्थेत चालली आहे.कडकनाथ कोंबड्यांचं संगोपन वाढीस लागावं या यामागचा उद्देश असल्याचं दंतेवाडाच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकार कडकनाथ कोंबडीचं संगोपन, संवर्धन आणि तिच्या मार्केटिंगसाठी पुढं सरसावलेत. त्याचाच एक भाग म्हणून दंतेवाड्यात हे अनोखं लग्न पार पडलं गेल आहे.