तोतया पोलिसाने महिला दुकानदाराला लुबाडले

कल्याण : प्लास्टिक बंदी विरोधात सर्वत्र जोरदार कारवाई सुरु असून याचा फायदा भामट्यांनी घेण्यास सुरुवात केली असून कल्याण पूर्वेतील एका महिला दुकानदाराला पोलीस असल्याची बतावणी करत प्लास्टिक पिशव्या बाळगल्या म्हणून धमक्या देत त्याच्याकडून सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे .या प्रकरणी सदर तोतया पोलीस व त्याच्या साथीदारा विरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे .
      कल्याण पूर्वेकडील शंकर पावशे रोड येथील साई कुंज अपार्टमेंट येथे विंदू सिंह यांचे शिवशक्ती किराणा स्टोर्स नावाने दुकानं आहे .काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या दुकानात बसल्या असतानाच एक अनोळखी इसम रिक्षातून उतरून दुकानात आला .त्याने खारी व बिस्कीट चे पुडे मागितले असता या महिलेने प्लास्टिक च्या पिशवीत त्याला ते देवू केले त्यानंतर त्याने आपण पोलीस असल्याचे सांगत प्लास्टिक बंदी असतना तुम्ही कसे वापरता असे विचारत कारवाई करतो अशी धमकी देत या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 3 हजारांची रोकड घेत तेथून काढता पाय घेतला .काही वेळाने या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी या तोतया पोलीस व त्याचा साथीदार रिक्षा चालका विरोधात गुन्हे दखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email