तोतया पोलिसाने दुकानदाराला घातला १० हजारांना गंडा

डोंबिवली -कल्याण पूर्व पिसवली येथे मदन भोईर चाळीत राहणारे शामलाल यादव यांचे किराणा मालाचे दुकान आहे .काल सकाळी साडे नवू वाजण्याच्या सुमारस एक अज्ञात इसम त्यांच्या दुकानात आला व गुटखा मागितला .यादव यांनी आपण गुटखा विकत नसल्याचे सांगितल्याने त्याने आपण मानपाडा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी आहोत तू गुटखा विकतोस असे सांगत दुकानाची झडती घेणे सुरु करत दुकानामधील १० ह्जाराची रोकड घेतली व बाहेर उभ्या असलेल्या गाडीत बसून तेथून निघून गेला .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने यादव यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email