ते लॉटरीचे तिकीट बनावट ? लॉटरी सेंटर विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली : नालासोपाऱ्याला राहणाऱ्या टेम्पो चालकाने काही दिवसापूर्वी कल्याणातील लॉटरी च्या दुकानातून महाराष्ट्र राज्य सरकारच्या 1 कोटी 11 लाख रुपयांचे लॉटरीचे तिकीट काढले लॉटरी लागली देखील त्यांना लॉटरी कार्यालयात खेटे घालूनही त्यांना पैसे मिळाले नाही .अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती .या तक्रारी नुसार पोलिसांनी प्रिन्स लॉटरी सेंटर चा विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपाऱ्याला राहणाऱ्या सुहास कदम या टेम्पो चालकाने16 मार्च रोजी कल्याणमधील प्रिन्स लॉटरी सेंटरमधून100 रुपये किंमतीचे गुडी पाडवा सोडतची एक तिकीट खरेदी केले. लॉटरी तिकीटावर बक्षिसाची रक्कम 1 कोटी11 लाख रुपये होती. सुहासने 20 मार्च लॉटरीच्या सोडत दिनी तिकीट पाहिले. तेव्हा त्याला ते तिकीट लागले होते. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने लॉटरी तिकीटच्या कल्याण येथील प्रिन्स लॉटरी सेंटर या दुकानावर धाव घेतली. या दुकानात त्याला उलट उत्तर दिले गेले त्या नंतर सुहास नवी मुंबई येथे लॉटरी विभागाचा कार्यालयात गेल्यानंतर तुमचेच तिकीट लागले नसून अन्य दोन जणही तिकीटाच्या रक्कम घेण्यासाठी येऊन गेल्याचे सांगण्यात आले.हे एकून सुहास चक्रावला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने या प्रकरणी कल्याण गाठत महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रर दखल केली या तक्रारी नुसार पोलिसांनी अखेर लॉटरीची बनावट तिकिटे जवळ बाळगून विक्री करून शासनचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी प्रिन्स लॉटरी सेंटर चा विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .याबाबत पोलीस अधिकारी अस्लम खातीब यांच्याशी संपर्क साधला असता तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दखल केला आहे .तक्रारदाराने अद्याप लॉटरीचे तिकीट आमच्याकडे दिले नसून तपास सुरु आहे असे सांगितले.
Please follow and like us: