तुमच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा कसा ?`स्वच्छ डोंबिवली`ग्रुपच्या बैठकीत डोंबिवलीकरांचा भाजप नगरसेवकांना प्रश्न

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी डोंबिवलीकर एकत्र आले असून त्यांनी बनविलेल्या ` स्वच्छ` डोंबिवली ग्रुपच्या बैठकीत बोलाविण्यात आलेल्या नगरसेवकांना उपस्थित नागरिकांनी  `तुमच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा कसा ? असा प्रश्न विचारला. त्यामुळे ही बैठकीची चर्चा सुरु झाली आहे. पालिकेचे सफाई कर्मचारी काम करत नसतील आमच्या नंबरवर फोन करा , आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करू असे आश्वासन नगरसेवकांनी दिले.
 शहर स्वच्छतेवर जनजागृती करण्यासाठी आणि पुढील भूमिका ठरविण्यासाठी चित्तपावन ब्राम्हण संघ सभागृहात बुधवारी सायंकाळी स्वच्छ` डोंबिवली ग्रुपच्या बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठ्कीत ग्रुपचे अॅडमिन केदार पाध्ये, नगरसेवक संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे, मुकुंद पेंडणेकर, शैलेश धात्रक, राजन सामंत यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी माधव घुले यांनी सुरुवातीला केळकर रोडवरील वाहतूक व्यवस्थेवर माहिती दिली. तर याचा रस्त्यावर दुकानदार दुकान बंद करून कचरा रस्त्यावर टाकत असल्याची वास्तविकता मांडली. सफाई कर्मचारी आपले काम व्यवस्थित करत नसल्याचा आरोपही यावेळी नागरिकांनी केला. यावर नगरसेवक राजन सामंत आणि शैलेश धात्रक यांनी अश्यावेळी आमच्या नंबरवर फोन करा आणि अश्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करू असे सांगितले. नगरसेवक संदीप पुराणिक यांनी घंटागाडी आणि सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून आमचा पालिकेकडे पाठपुरावा सुरु आहे असे सांगितले. यानंतर श्रद्धा जोशी यांनी थेट नगरसेवकांना जाब विचारत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा प्रशासनावर अंकुश नसेल तर तुमच्या आश्वासनावर नागरिकांनी विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला. खाजगी जागेत कचरा जमा होत असेल तर पालिका प्रशासन यावर काय कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांनी विचारला. प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून दिला तरी पुढे पालिकेचे कर्मचारी हा कचरा एकत्र करून आधारवाडी येथील डंपिंग ग्राउंडवर टाकतात, त्यामुळे नागरिकांनी याक कचऱ्याचे वर्गीकरण करून काय उपयोग ? प्रशासनाला याविषयी जाग कधी येणार असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. डोंबिवलीत पश्चिमेकडील स्टेशनपरिसरात १५० मीटर च्या आत एकही फेरीवाला बसत नाही. तसेच स्टेशनजवळील कचराकुंडी हटविल्याबद्दल या बैठकीत नगरसेवक शैलेश धात्रक यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी केदार पाध्ये म्हणाले , शहर स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे अशी सूचना केली.या ग्रुपची पुढील बैठक डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात आयोजित करणार असल्याचे घुले यांनी सांगितले.   
अॅक्शन प्लॅन` तयार करणार …
शहरातील स्वच्छतेवर जनजागृती कशी करता येथील ? कशी उपायोजना करता येथील यासाठी या ग्रुपच्या वतीने लवकरच अॅक्शन प्लॅन` तयार करणार  येणार असल्याचे वंदना सोनावणे यांनी या बैठकीत सांगितले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email