तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली ; अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मंत्रालयात बदली

(श्रीराम कांदु)
आपल्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे राजकीय नेते आणि पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेले पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची आज नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नयना गुंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचीही बदली करण्यात आली असून त्यांची मुंबईत मंत्रालयात नेमणूक करण्यात आली आहे.
25 मार्च 2017 रोजी मुंढे यांची पीएमपीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. आपल्या कारकिर्दीत आपल्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन पीएमपीएमएलचे कर्मचारी आणि राजकीय नेते, पदाधिकारी यांना सळो की पळो करून सोडले होते. पीएमपीएमएलचा गाडा रुळावर येत असतानाच 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच तुकाराम मुंढें यांची बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी 2008 च्या बॅचच्या नयना गुंडे यांची वर्णी लावण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील शिवसृष्टी बाबत काल मुख्यमंत्र्याकडे पुण्यातील नेत्यांची बैठक झाली होती. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यासह इतर गटनेते या वेळी उपस्थित होते. या बैठकीच्या दरम्यानच मुंढे यांच्या बदलीची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना हटविण्यासाठीची भाजप नेत्यांची फिल्डिंग यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email