तीन कामगारांच्या मृत्यूला ठेकेदार जबाबदार ,लक्ष्मण चव्हाणला अटक

डोंबिवली दि.२८ – डोंबिवलीजवळील खंबालपाडा येथील एम आय डी सी चे चेंबर सफाई करताना तीन कामगार गुदमरून मरण पावले त्याच्या मृत्यूला ठेकेदार लक्ष्मण चव्हाण जबाबदार असून टिळक नगर पोलिसांनी अटक केली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 304 कलमाखाली दाखल केला आहे. या संदर्भात माहिती देताना एम आय डी सी चे उपअभियंता दीपक पाटील म्हणाले ,शुक्रवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सुमारे अडीच मीटर खोल असलेले चेंबर सफाई करण्याचे काम सुरू होते एरव्ही पाणी पुरवठा सुरू असल्याने सफाई करता येत नाही.

प्रथम एक कामगार उतरला व त्याने लावलेला बेल्ट काढून दुसऱ्याला दिला चेंबरमध्ये टॉक्सिक ऐसीड तयार झाल्याने तो बेशुद्ध झाला म्हणून दुसरा उतरला त्याने त्याला खाद्यावर टाकून वर आणेपर्यंत तो पण बेशुद्ध झाला व त्या दोघांना काढण्यासाठी तिसरा उतरला व तोही बेशुद्ध झाला ही घटना मानपाडा व टिळक नगर पोलीस स्टेशनला कळवली पण ती आमची हद्द नाही असे सांगत पोलिसांनी हात वर केले फायर ब्रिगेडला कळवूनही ते आले नाहीत अखेर ते आले व त्यांनी तिघांना बाहेर काढले

टिळकनगर पोलिसांनी ठेकेदार चव्हाण यांचे विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे काल त्याला कोर्टात नेण्यात येणार आहे कामगारांचा विमा काढला असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले देविदास संदर्भांन पाजगे (30) महादेव धोंडिबा झोपे (38) व चंदर्भांन झोपे अशी मृत कामगारांची नावे आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email