तलवारी कोयता स्टंप ने दोन गटात धुमसचक्री एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.३० – व्हाट्स अप वर प्ले बॉय कंपनी मध्ये नोकरी लावून देतो चा मेसेज पाठवल्यानंतर तरुणांच्या दोन गटात वाद झाले आज या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या भांडणातून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत .या प्रकरणी विष्णू नगर पोलिसानि परपस्पर विरोधी गुन्हा दाखल चार जनांना ताब्यात घेतले आहे.
डोंबिवली पश्चिम जुनी डोंबिवली सखाराम नगर परिसरात राहणाऱ्या सौरव मोहिते याने याच परिसरात राहणाऱ्या अशोक सिंग ला व्हाट्स अप वर प्ले बॉय कंपनी मध्ये नोकरी चा मेसेज पाठवला होता. अशोक सिंग ने या मेसेज बाबत आपल्या ग्रुप मध्ये सांगितलं.काल अशोक ने या मेसेज बाबत सौरव ला गाठत जाब विचारला होता. त्यामुळे घाबरलेल्या सौरव ने याबाबत आपल्या मित्रांना सांगितले. आज सायंकाळी चार वाजण्याच्या मेसेज वरून पुन्हा अशोक व सौरव च्या गटात वाद झाला. यावेळी नंदू पवार महेश पवार अशोक सिंग हर्ष सोळंकी रोहन म्हात्रे युसूफ खान आणि इतर तीन चार जणांनी सौरव मोहिते ,कुंदन जोशी,मुकेश जोशी ,निलेश शिगारे , यांच्यावर हल्ला चढवला. या दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत कुंदन जोशी चा मृत्यू झाला तर मुकेश जोशी ,निलेश तागारी ,नंदू पवार जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात दोन्ही गटाकडून परपस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करत तपास सुरू केला असून चार जणांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.