तरुणीला लुटण्याचा प्रयत्न करणा-या तृतीयपंथीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप
ठाणे – ठाण्याच्या माजिवडा येथील नाशिक महामार्गावर तृतीयपंथी रस्त्यानं ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटत असल्याचा आरोप होत आहे. माजीवाड नाका येथे रस्त्यानं चालणाऱ्या एका तरुणीला लुटण्याचा प्रयत्न या तृतीयपंथीनी केला यानंतर तरुणीने कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाई झाली नाही म्हणून तरुणीने मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह माजिवडा गाठत या तृतीयपंथीयांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जण पळून गेले. पण एक तृतीयपंथी मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप दिला.
Please follow and like us: