तरुणाला मारहाण करत चैन लांबवत चाकूने हल्ल्याचा प्रयत्न – डोंबिवलीतील घटना

डोंबिवली दि.२८ – तरुणांच्या सात ते आठ जणांच्या टोळीने एका इसमाची चैन हिसकावून त्याच्या वर चाकूने हल्ला करण्यात आला. मात्र या इसमाने तेथून पळ काढला. या टोळीने त्याचा पाठलाग करत त्याचे घर गाठत इमारतीच्या रहिवाशांच्या दरवाजाला लाथा मारल्या यावेळी या इसमाच्या मदतीसाठी गेलेल्या दोन जणांवर आय टोळीने चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केल्याची घटना कल्याण पूर्व आडीवली परिसरात घडली आहे .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात सोनू ठाकूर,गणेश उर्फ गण्या,परश्या व त्याच्या इतर 3 ते 4 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

कल्याण पूर्व मलंग रोड आडीवली तलावाजवळ बेजोडे निवास मध्ये राहणारे वैभव कचरे ओला कॅब चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .काल रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास कचरे आपली गाडी इमारती खाली उभी करून घरी जात असताना सोनू ठाकूर,गणेश उर्फ गण्या,परश्या व त्याच्या इतर ३ ते ४ साथीदारांनी त्यांना हटकले.जोरजोरात ओरडून या टोळीने कचरे च्या दिशेने धाव घेत त्यांनी कचरे यांची 20 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकवली तसेच कचरे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र कचरे यांनी त्यांना प्रतिकार करत तेथून पळ काढत थेट घर गाठले .त्यानंतर या टोळीने या इमारती मध्ये घुसून रहिवाशांच्या दरवाजाला लाथा मारल्या .याचा जाब विचारण्यास गेलेले इमारती मधील रहिवासी नवीन सिंग व शंकरलाल गुप्ता यांच्या वर चाकूने हल्ला केला .या हल्ल्यात हे दोघे जखमी झाले आहेत.त्यानंतर या टोळीने शिवीगाळ करत कुणी वाचवण्यास आले तर त्यांना मारू अशी धमकी देत या परिसरात दहशत माजवली .या प्रकरणी कचरे यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी सोनू ठाकूर,गणेश उर्फ गण्या,परश्या व त्याच्या इतर 3 ते 4 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email