तरुणाची आत्महत्या; आठ जणांवर गुन्हा
धारूर – आमच्या मुलीसोबत अनैतिक संबंध का ठेवतोस असे म्हणत होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्या प्रकरणी आठ जणांवर धारूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रामदास दिलीप नाईकवाडे (रा. घागरवाडा, ता. धारूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील आठ जण रामदासला त्यांच्या मुलीसोबत अनैतिक संबंध का ठेवतोस असे म्हणत सतत त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून रामदासने घागरवाडा शिवारातील गाढव सोंडच्या माळावरील पळसाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.
रामदासचे वडील दिलीप नामदेव नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर धारूर पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार सुतनाशे करत आहेत.
Please follow and like us: