तब्बल वीस मिनिटे पाठलाग करत चोराला पकडले

श्रीराम कांदु 

मुंबई : मोबाईल चोरून पळणा-या चोराला वरळी पोलीस ठाण्याच्या दोन कर्तव्यदक्ष कर्मचा-यांनी तब्बल वीस मिनिटे पाठलाग करत पकडले.या पाठ्लागादरम्यान एक कर्मचारी जखमीही झाला तरही त्याने त्या चोराला पकडून बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की बुधवारी रात्री वरळी पोलीस ठाण्याचे वाहनचालक दीपक रामचंद्र भोसले आणि ऑपरेटर किरण काशीद हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन देसुरकर यांना घरी सोडून कलानगर विभागातुन पोलीस ठाण्याकडे परत येत होते.या दरम्यान भारतनगर झोपडपट्टीजवळ एक जण चोर चोर असे ओरडत एका मुलाच्या मागे धावत असल्याचे त्यांना दिसले. तो चोर गाडीच्या दिशेनेच येत होता. त्या चोराला पकडण्यासाठी काशीद हे खाली उतरले. मात्र चोर त्या आधीच पुढे उभ्या असलेल्या रिक्षात बसला आणि चालकाने रिक्षा पळविण्यास सुरुवात केली. मधल्या एका निमुळत्या रस्त्याजवळ रिक्षा येताच त्यातील तीन जण उतरले. काशीद हे त्यांच्या मागावरच असल्याने त्यातील एक जण पोलिसांच्या हाती लागला. त्याचे नाव कुणाल शंकर खोंडे (१९) असून रिक्षाचालक आणि त्याचे अन्य दोन साथीदार असे तिघे घटनास्थळावरुन पसार झाले. मुख्य म्हणजे रिक्षाचा पाठलाग करताच चालकाने उलट्या दिशेने रिक्षा आणल्याने रिक्षेची धडक काशीद यांना बसली तरी त्यानी चोराला सोडले नाही. या दरम्यान भोसले देखील त्यांच्या मागे होतेच. काशीद यांनी कलानगर जंक्शनजवळ पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करुन मदत मागितली. त्यानुसार बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोराला अटक केली.याप्रकरणी खोंडे याला अटक झाली असली तरी त्याचे अन्य तीन साथीदार मात्र फरार झाले असुन बीकेसी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email