डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवाशांना बाहेर पिटाळले ….
रेल्वे स्थानकातून प्रवाशांना बाहेर पिटाळले ….
डोंबिवली – माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ सकाळी रेल्वे प्रशिक्षणार्थीनी केलेल्या आंदोलनाचा फटका डोंबिवली रेल्वे स्थानकावर पडला.त्यामुळे नेहमीप्रमाणे चाकरमानी मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांची गर्दी वाढत गेली. प्रवाशी वर्ग संतप्त होऊन आक्रमक होईल आणि रेल्वे स्थानकात प्रवाशी स्थानकात आंदोलन करतील या भीतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी प्रवाशांना स्थानकाबाहेर पिटाळले. याबाबत डोंबिवली रेल्वे प्रबंधक अब्राहम यांना विचारले असता त्यांनी रेल्वे स्थानकात प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने याचा फायदा समाजकंटक घेऊन नये म्हणून सुरक्षततेसाठी पोलिसांना प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर काढावे लागले.दरम्यान आंदोलन मागे घेतल्यानंतर डोंबिवली रेल्वे स्थानकातून पावणे आकरा वाजता लोकल सुरु झाली. परिवहन सेवा नेहमीप्रमाणे सुरु होती तर चाकरमानी परत घरी जाण्यासाठी रिक्षांनी जाणे पसंत केले.