पालिका कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत ठिया आंदोलन…डोंबिवली अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते  महेश निंबाळकर यांचे अर्धनग्न अवस्थेत ठिया आंदोलन

डोंबिवली – अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग अधिका-यांच्या दालनात महेश निंबाळकर कुटुंबासह छेडले आंदोलन गेले वर्षभर एका मंदिराच्या झालेल्या अनधिकृत बांधकामा विरोधात कारवाईसाठी पाठपुरावा सुरु आहे. गेल्यावर्षी २२ मार्चला त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला होता. आता माझा जीव गेल्यावरच बांधकामावर कारवाई होणार का असा सवाल निंबाळकर यांनी विचारला आहे.काही वर्षांपूर्वी आलेल्या मुन्ना भाई एमबीबीएस सिनेमात संजय दत्त याने याप्रकारचे आंदोलन केल्याचे दुष्य होते.आता निंबाळकर यांनी केलेल्या आंदोलानाबद्द्लही अशीच चर्चा होत आहे.दरम्यान शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सध्या फारच गाजत असून त्यात या आंदोलनाने आता अधिकच भर पडली आहे.

निंबाळकर यांच्या आंदोलनानंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा बनला चर्चेचा विषय

शहरातील अनधिकृत बांधकामा विरोधात ग्रामीण भागातून पालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी गोळवलीचे नागरसेवक रमाकांत पाटील यांनी अनेकदा आवाज उठवला याप्रकरणी त्यांनी पालिकेसह वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला.त्याच प्रमाणे मध्यंतरी नगरसेवक शैलेश धात्रक व मंदार हळबे यांनीही याप्रकरणी पालिका अधिकारी या बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता.त्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही येथील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून डोंबिवलीचा उल्लेख घाणेरडे शहर असा केला होता.अनधिकृत बांधकामाचा विषय नुकत्याच झालेल्या महासभेतही गाजला होता.याप्रकरणी आधिका-यांवर कारवाईची मागणी झाली होती.

कालच नगरसेवकांनी याच केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धरणे देत ठिया आंदोलन केले होते.या आंदोलनात  प्रभाग क्षेत्र समिती सभापती खुशबू चौधरी, नगरसेवक निलेश म्हात्रे, राजन आभाळे, विश्वदीप पवार , मंदार टावरे, विशू पेंढणेकर, नितीन पाटील , नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, अलका म्हात्रे सहभागी झाले होते.फेरीवाले व अनधिकृत बांधकामे यासंदर्भात हे आंदोलन करण्यात आले होते.असे असुनही प्रत्यक्षात मात्र या अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई करत नसल्याचेच चित्र शहरात दिसत आहे.दरम्यान सर्व स्तरातुन विरोध होत असतानाही सदर अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याबद्दल शहरात उलटसुलट चर्चा होत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email