डोंबिवली पूर्वेकडील सात रस्त्यांचे काँक्रीटीकरण कामे गेली पाच वर्ष रखडली
रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पाच वर्ष रखडले…
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – कल्याण – डोंबिवली महानगरपालिका किती संथ गतीने काम करत आहे याचा प्रत्यय डोंबिवलीत आला आहे.येथील पूर्वेकडील सात रस्त्यांचे काँक्रीटीकरण काम गेली पाच वर्ष रखडली आहे. मानपाडा , पाटकर, एस.व्ही., फडके, राजाजी , डॉ.राथ, केळकर या पथावरील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा १९ नोव्हेंबर २०१२ रोजी कार्यादेश देण्यात आला होता.हे कामाची मुदत १५ महिने होती.मात्र ५ वर्ष उलटूनही हे काम पूर्ण झाले नाही.यावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी आवाज उठवला आहे.महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी कामाचे मुदत वाढवून ठेकेदार फायदा करून देत असल्याचा आरोप थरवळ यांनी पालिका आयुक्त पी.वेलूरासु यांनी दिलेल्या पत्रात केला आहे.या कामास विलंब होण्यास जबाबदार अधिकारी असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही थरवळ यांनी केली आहे.