डोंबिवली – स्वराज्य इव्हेंट्स व आविष्कार ग्रुप यांनी डोंबिवली परिसरातील खवय्यांसाठी खास बिर्याणी फेस्टिव्हलचे आयोजन 13 ते 15 एप्रिल रोजी केले आहे.
येथील स वा जोशी शाळेच्या प्रगणात सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत सुरू रहाणार असून 40 पेक्षा जास्त शाकाहारी व मांसाहारी प्रकारची बिर्याणी उपलब्ध होणार आहे यात हैद्राबादी ,दम ,बांबू ,मटका ,मलई ,इटालियन ,आगरी ,सुरमई आदी प्रकारची बिर्याणी मिळणार आहे चटकदार बिर्याणी खाल्यावर शाही तुकडा ,फिरनी ,आईस्क्रीम बनवून दिले जाणार आहे अशी माहिती आयोजक हर्षद समर्थ यांनी दिली या प्रसंगी शशिकांत कोठेकर ,समीर चिटणीस उपस्थित होते .तसेच रोज संध्याकाळी गझल ,शायरी ,व मुशायरा याची मैफल असणार असून 30 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे अधिक माहितीसाठी 9819551875 /8356970778 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.