डोंबिवली तिकीट आरक्षण केंद्रावर राडा  

डोंबिवली तिकीट आरक्षण केंद्रावर राडा
डोंबिवली  : – दि . १८ ( प्रतिनिधी )
  डोंबिवली रेल्वे आरक्षण केंद्रावर दोन दिवसापासून तिकिटासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांचे आपसात भांडण झाले.  या भांडणाचा फायदा स्थानीक तिकीट दलालांनी घेतला .या दलालांनी एका महिलेचा कुटुंबियांना बेदम मारहाण केली .दलालच्या मारहानीत पाच ते सहा जण जखमी झाले.  हा राडा डोंबिवली आरपीएफ कर्मचार्यांसमोर सुरू होता.  मात्र त्याने बघ्याची भूमिका घेतली होती. या प्रकरणी तक्रारीनंतर डोंबिवली जी आर पी ने तीन जणांना  अटक केली.  यात  आरोपींमध्ये दोन महिलाचा समावेश आहे. दलालांच्या या दादागिरीमुळे डोंबिवली मध्ये एकच खळबळ उडाली आहे .
          रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर तिकीट दलालांचा सुळसुळाट असून त्यांची दादागिरी  सुरु आहे .अनेकदा रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर तिकीट दलाल आणि रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांमध्ये वाद निर्माण होऊन या तिकीट दलालांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना अनेकदा घडल्या आहेत.अशीच एक घटना रविवारी  मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवलीत घडली .डोंबिवली राहुल नगर येथे राहणारी रानु शाहू ही महिला उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेच्या डोंबिवली तिकीट आरक्षण  केंद्रावर  गेल्या तीन दिवसांपासून रांगेत उभी होती . मध्यरात्री तिचा नंबर  आला.  ती रांगेत उभी असताना मिथिलेश मिश्रा ( ४६ )  महिलेने मी येथे उभी राहणार असे सांगितल्याने या दोघां महिलांमध्ये वाद झाला दोन्ही महिलांनी आपल्या कुटुंबियांना या ठिकाणी बोलावून घेतले .त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला .या भांडणाचा फायदा तेथे असलेल्या तिकीट दलालांनी घेतला .तिकीट दलालांसह १०  ते १२  जणांनी शाहू यांच्या सह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली . या मारहाणीत रानु शाहू ,सूरज गुप्ता आणि चौघे मारहाणीत गंभीर जखमी झाले .डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात सुरज अशोक गुप्ता यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी  अखिलेश त्रिभुवन गुप्ता ( २७ )यासह  मिथिलेश विद्याधर मिश्रा ( ४६ ) आणि महेंद्र राजभर मिश्रा ( ३५ ) या दोन महिलांना अटक केली आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email