डोंबिवली – डोळे तपासणीचे 3 लाखाची मशीन चोरी कोपर पोलीस चौकी समोरची घटना
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमे मधील कोपर गावात नेत्रम अॉप्टिक्स दूकानात (काल) रोजी मध्य रात्री 3.30 च्या सुमारास चोरी झाली. ही चोरी cctv मध्ये कैद झाली असून दोन चोरट्यांनी दुकानातील डोळे तपासणीचे तब्बल 3 लाखाचे मशीन चोरले.
मशीन सोबत दोन गॉगल आणि सहाशे रुपये सुद्धा चोरट्यांनी चोरले असे दुकानदाराने सांगितले. दुकानदार किरण यांनी सांगितले की माझ्या दूकानापासून समोरच हाकेच्या अंतरावर कोपर रोड ( ईस्ट वेस्ट ब्रीज जवळ ) पोलिस चौकी आहे. जेथे दिवस रात्र पोलिसांची गस्त असते. पोलिस चौकीच्या समोरच चोराने एवढी मोठी चोरी रात्रीच्या वेळेस दूकान फोडून करणे म्हणजे आपण डोंबिवली नगरीत राहणारे नागरीक किती सुरक्षित आहोत ? असा प्रश्न निर्माण करते.
याबाबत दोन चोरट्यांन विरोधात विष्णूनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला असून याबाबत तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.सध्या शाळांच्या परीक्षा संपत असून नागरिक बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असून आशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे
Please follow and like us: