डोंबिवली घरफोडी २७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास
डोंबिवली – कल्याण डोंबिवली मध्ये चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून बंद घराचे कुल्ह्प तोडून ,खिडक्यांचे ग्रील उचकटून घरातील लाखोचा मुद्द्मेमाल लंपास करण्याचा सपाटा लावलं आहे .पोलीस यंत्रणा या घटना रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या आकडेवारी वरून दिसून येत आहे .त्यामुळे नागरिकामध्ये दहशत पसरली आहे .त्यातच काल देवदर्शनासाठी गेलेल्या एका व्यासायीकाच्या बंगल्यातील बाथरूम चे ग्रील वाकवत चोरट्यांनी घरातील तब्बल २७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
डोंबिवली ठाकुर्ली चोळेगाव येथे समर्थ कृपा बंगल्या मध्ये राहणारे परेश पाटील हे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारस सह कुटुंब घराला कुलुप लावत पुणे जेजुरी येथे देव दर्शणासाठी गेले होते .या दरम्याण घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराच्या पहिल्या व दुसर्या माल्यावरील बाथरूम चे ग्रील वाकवून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने ,भांडी रोख रक्कम असा मिळून एकूण २७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यानंतर पाटील यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार प[पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाख्ल करत त्याचा शोध सुरु केला आहे .