डोंबिवली – कोपर रेल्वे स्थानकदरम्यान लोकलमधील गर्दीचा बळी

डोंबिवली – डोंबिवलीतील भावेश नकाते आणि धनश्री गोडवे यांचा यापूर्वी लोकलमधून पडून मृत्यू झाल्याने शहरात नव्हे तर ठाणे राज्यात चर्चा सुरु झाली होती. बुधवारी लोकलमधील गर्दीमुळे सकाळी एका तरुणाचा डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान बळी गेल्याची घटना घडली. या रेल्वे अपघाटची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

      रजनीश प्रमोद सिंग ( ३० ) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्यातरुणाचे नाव असून डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील सलाका अपार्टमेंट मध्ये राहत होता. परेल येथील सुजुकी मोटर कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून काम करत होता. कल्याण रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या  छत्रपती शिवाजी टर्मिनस लोकलमध्ये डोंबिवली रेल्वे स्थानकात ८. ४० मिनिटांनी चढले.लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने रजनीशला आत घुसता आले नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाज्याला लटकून त्याला प्रवास करावा लागला. डोंबिवली – कोपर रेल्वे स्थानकादरम्यान रजनीश रेल्वे गाडीतून पडल्याचे समजताच लोकलमधील प्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना कळविले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email