डोंबिवली औद्योगिक विभागातील जिर्ण जलवाहिन्या बदलणार,पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होणार 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली,ता १   डोंबिवली औद्योगिक विभागाची स्थापना साधारणपणे पन्नास वर्षापूर्वी झाली व त्यावेळेस या भागात पिण्याच्या पाण्याची जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या या वाहिन्या आता जिर्ण झाल्या आहेत यामुळे औद्योगिक व निवासी भागाला योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही शिवाय या वाहिन्यांची गळतीही होत असून देखभाल दुरुस्ती करणे अवघड जात आहे यासर्वाचा विचार करुन औद्योगिक विकास मंंडळाने औद्योगिक व निवासी भागातील एकूण ३५ कि मी लांबीच्या जिर्ण जलवाहिन्या बदण्याचे ठरवले असून या कामाला सुरवातही झाली आहे.
औद्याेेगिक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक व निवासी भागात असलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून अनेक ठिकाणच्या जलवाहिन्या आठ दहा फुट खोल गेल्या असल्याने त्याची देखभाल करता येत नाही शिवाय आता या भागात मेाठया प्रमाणात लोकवस्ती वाढत असल्याने पाणी पुरवठा येाग्य होत नाही पेंढरकर काॅलेज रोड,खंबालपाडा रोड या रस्त्याच्या मधून जलवाहिन्या गेल्या असून त्या बदलण्यात येणार आहे शिवाय कल्याण शिळ मार्गावरील मुख्य ६०० मी मी व्यासाची नवी जलवाहिनी टाकण्याचे प्रस्तावित आहे असेही सांगण्यात आले.शिवसेनेचे या भागाचे कार्यकर्ते व डोंबिवली वेलफेअर सोसायटीचे कार्यवाह नंदू नलावडे यांनीही माहितीच्या अधिकारात निवासी भागातील जिर्ण जलवाहिन्या खराब झाल्या आहेत त्या संदर्भात माहिती विचारली असता मंडlळाने निवासी भागातील जिर्ण जलवाहिन्या बदलण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे कळवले आहे.व निविदा मंजूर झाल्यावर कामाला प्रारंभ होईल असेही सांगीतले.
जिर्ण जलवाहिन्या बदलण्याचे काम येत्या दिड वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा असून यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email