डोंबिवली औद्योगिक परिसरातील किचन क्राफ्ट कंपनी मध्ये भीषण आग
डोंबिवली – डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज दोन मधल्या औषध कंपनी आरती केमिकलच्या बाजुला असलेल्या किचन क्राफ्ट कंपनी मध्ये भीषण आग लाग्ल्यानमुळेे आज सोमवारी सायंकाळी या क्षेत्रामध्ये भितीचं वातावरण पसरलं. या कंपनीबाजुला असलेल्या आरती केमिकल मध्ये अनेक ज्वलनशील रसायनं असतात आणि तिथे जर आग पसरली तर भिषण दुर्घटना होण्याची भीती होती.आग नियंत्रण करण्यासाठी डोंबिवली बरोबर कल्याण व अन्य अग्निशमक दलाच्या गाड़िया बोलोवल्या गेल्या. याच बरोबर स्थानीय नगरसेविका दमयंती वझे यांनी टँकर पाठवून आग नियंत्रणात आणण्यास मदत केली.मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून आग नियंत्रणात आणण्याचा अग्निशामक दल प्रयत्न करत आहे.
Please follow and like us: